स्थलांतर – स्वतःच्या जागेत .

>मित्रांनो सांगायला अत्यंत आनंद होतो की “वाँट टु टॉ़क ची स्थलांतर प्रक्रिया पुर्ण झालेली आहे . आता माझे लिखाण
http://www.pvinayak.com
या संस्थळावर उपलब्द्ध असेल . माझ्या फुटकळ लिखाणाला आता स्वत:ची जागा मिळालेली आहे . आपले प्रेम आहेच ,नव्हे आपल्या प्रेमामुळेच मी इथवर आलेलो आहे ,हे प्रेम असेच वृद्धींगत व्हावे हीच नम्र विनंती ..
आपला मित्र
विनायक

बाजार मांडियेला….!

>

”माझा मुलगा ना, आय.आय.टी. करतोय. ” कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी हे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. कारण बारावी विज्ञान शाखेतील मुलांपैकी निम्मी मुले आज ”आयआयटी करत आहेत.” ”आयआयटी” त प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यास करणे याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे आय अय टी करणे .


आयआयटी ,भारतातली सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्था, या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सर्वोत्कृष्टच असतो, असायचा… त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रयत्न तर सगळे करायचे. पण, त्याचा इतका बाऊ होत नव्हता. पण, साधारणतः २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून सारेच बदलत गेले. माणसाच्या आणि समाजाच्या अपेक्षा वाढल्या.. 6 आकडी पगार खुणावू लागले. पण, त्यावेळी स्वत:तल्या क्षमतांची जाणीव करुन घेण्याइतपत वेळ मात्र आपण स्वतःला देऊ इछित नव्हतो. इंस्टट फूड सारखे इंस्टंट शिक्षण आणि पैसा मिळावा असे वाटु लागले . नेमका याचाच फायदा घेऊन आधी कोटा, राजस्थान येते, आणि नंतर संपूर्ण देशभरात आयआयटी क्लासेस सुरू झाले आणि यथावकाश त्यांचा बाजार झाला…
.


किती आहे या बाजाराची व्याप्ती? आजघडीला मला एकटयाला 50-60 आयआयटी प्रशिक्षण संस्था माहिती आहेत. ज्यांची वेगवेगळया शिक्षणविषयक मासिकात पानभर जाहिरात द्यायची क्षमता आहे. गावागावात आणि राज्याराज्यात असणारे शिलेदार वेगळेच….! अख्या भारतातुन साधारणत: 5 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसतात. आणि, त्यातले कमीत कमी 75 टक्के लोक अशा संस्थांशी निगडीत असतात. आणि, या दोन वर्षासाठी फी 60,000 ते 2 लाख अशी असते. या सगळयांचा विचार केला, तर या क्लासेसची वार्षिक उलाढाल काही हजार कोटीत नक्कीच जाते….


या बाजारमुळे होणारा परिणाम म्हणजे विद्यार्थी, त्यांचे पालक तर नागवले जातात माझ्या काही मित्रांनी कर्ज काढून ही फी भरलेली आहे. हेसुध्दा एकवेळ मान्य केले असते. जर, खर्‍या अर्थाने या क्लासेसमध्ये शिक्षण मिळाले असते. पण, या सर्व संस्थांनी शिक्षणाच्या मूळ तत्वालाच हरताळ फासला आहे. दहावीत मी एका क्लासला होतो. त्या क्लासमुळे मी 94 टक्के चा 96 टक्के वर तर आलोच, पण माझा 70 टक्के चा एक मित्र 80 टक्केवर आला. आणि, आजही सरांना फोन केला, तर ते आमच्या बॅचचे यश म्हणून माझ्या मित्राचे नाव घेतात. कारण, ही आपली शिक्षण पध्दती आहे. कोणताही शिक्षक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतो, केला पाहिजे ,शाळेत तर हे व्हायचेच पण अगदी कॉलेजचे शिक्षणही बहुतांशी या तत्त्वावरच आधारलेले असते. या क्लासेसमध्ये या संकल्पनेलाच हरताळ फासलेला आहे. क्लास सुरू झाल्यानंतर काही दिवसातच 100 पैकी ज्या दहा मुलांकडून यशाची अपेक्षा आहे. अशांना वेगळे करून सर्व लक्ष त्यांच्यावर केंद्रीत केले जाते. आणि, त्यांना एक-दोन सोयी देण्यासाठी उरलेल्या 90 जणांचे पैसे वापरले जातात. आणि, इथेच हा बिझनेस होतो कारण अगदी त्या दहाजणांशीही यातल्या कोणत्याही शिक्षकाचे भावनिक नाते तयार होत नाही . कारण ती दहाजण त्यांच्यासाठी फक्त प्रॉडक्ट असतात. ज्यांचे मोठेमोठे फोटो छापून त्यांना पुढच्या वर्षीचा बिझनेस मिळणार असतो. आणि म्हणूनच या क्लासेसचा फॉर्म भरतानाच आम्ही तुमचा फोटो व नाव कधीही व कुठेही वापरू शकतो. असा नियम असतो.


साहजिकच विद्यार्थी हा प्रॉडक्ट बनल्याने आणि त्याचे यश हे एक प्रॉफिट स्टेटमेंट असल्याने मग त्यांच्या यशासाठी एक पॅटर्न बनवला गेला. कोटयात बनलेला हा पॅटर्न आता देशभर पसरलेला आहे. अतिमेहनत आणि काहीसे पाठांतर यावर आधारलेला हा पॅटर्न अर्थातच बिनबुडाचा आहे. आयआयटीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वर्षी नापास होणार्‍या मुलांची वाढलेली संख्या आणि आम्हाला टॅलेन्ट मिळत नाही आहे अशी आयआयटी प्रोफेसर्सची ओरड हे हीच बाब अधोरेखित करते. हे टाळण्यासाठी त्यांनी काही उपाय योजले, मात्र अर्थातच ते अपुरे ठरले.


महत्वाचे म्हणजे या व्यवसायाला अनेक कंगोरे आहेत.आपण आधी त्यांच्या गिर्‍हाईकांबद्दल पाहु( होय त्यांच्यासाठी ते गिर्‍हाईकच असतात) .सहसा दक्षिणेकडील माणसे ही बुध्दीवादी असतात. आणि, त्यांना मेंदूशी खेळायला आवडते. त्यामुळे असा समाज हा या क्लासेसचा ”सॉफ्ट टार्गेट” असतो. कारण, हे विद्यार्थी 12 वी नंतर असणार्‍या परिक्षांचा अभ्यास सहावीपासूनच सुरू करतात. लक्षात घ्या, एका वर्षाला साधारण 50,000 फी धरली, तर फीच रक्कम वाढतेच. पण, ”सरावाच्या जोरावर ते सहज बाजीही मारतात.” सर्वसाधारणपणे, इतर विद्यार्थी जे 2 वर्षात शिकतात, ते हे सहा वर्षात शिकतात. त्यांचा दुसरा सॉफ्ट टार्गेट विभाग म्हणजे उत्तरेकडचा भाग. यासंदर्भात मला जी माहिती मिळाली त्यानुसार या भागात ”हुंडा” व तत्सम पध्दतीचे प्रस्थ हे फार मोठे आहे. आणि, एखाद्यापुढे ”आयआयटी” ही डिग्री लागली की ती रक्कम आपोआप दुप्पट होते. याचा अर्थ, या शिक्षणाचा कोणताही खर्च त्यांना करायचा नसतो. आणि, ज्ञान किती मिळाले त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे अर्थातच क्लासवाल्यांचे फावते. महाराष्ट्र व मध्य भारतात या दोन्ही Extremities नसल्या तरी माध्यम क्रांतीमुळे त्या आपल्यापर्यंत येतात, मोहवतात व आपण अलगद जाळयात अडकतो. मोठमोठे बॅनर ,आर्ट पेपर वर जाहिराती , एम बी ए झालेल्यांचे प्रोफेशनल बोलणे इ. गिर्‍हाइकाला भुलवणारे फंडे सोबतीला असतातच.


याशिवाय, या काळात विद्यार्थ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना यश तर मिळत नाहीच पण त्यांचा सर्वांगीण विकासही खुंटतो. पहिली गोष्ट म्हणजे हे क्लासेसवाले कोणत्याही मुलाला आयआयटी करायला देतात. त्याची लेवल तपासणे हे त्यांना गरजेचे वाटत नाही. अर्थात २00/- घेऊन ऍप्टीटयुड टेस्ट होतात. पण, त्या फक्त पैसे काढण्यासाठी आणि बिनकामाच्या असतात. कारण त्यात कमी गुण मिळालेल्यांना ऍडमिशन देताना मी स्वत: पाहिलेले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे फ्रँचाईजीकरण…. आजकाल या सर्व क्लासेसनी देशभर आपले जाळे विस्तारले आहे ते याच माध्यमातून…. पण त्यामुळे एखाद्या फ्रॅंचाईजी ओनरला प्रॉफिट झाला नाही की तो फ्रॅंचाईजी बंद करतो आणि मुलाना वार्‍यावर सोडतो. नवीन क्लास पाहिला तर पुन्हा तिथे पुर्ण फी भरायची …म्हणजे जवळपास अशक्यच.. दुसरी गोष्ट अशी की, यातले बहुतांशी शिक्षक हे उत्तर भारतीय वा अतिदक्षिणेकडील असतात. त्यामुळे त्यांच्याशी, त्यंच्या भाषेशी आणि त्यांच्या शिकविण्याच्या पध्दतीशी विद्यार्थ्यांना समरस व्हायला वेळ लागतो. याशिवाय सीबीएसई अभ्यासक्रम जास्त उजवा ठरणे हेदेखील त्याला पोषक ठरते. या सगळयाशी मेळ साधेपर्यंत तो शिक्षकच नोकरी सोडतो. मग पुन्हा दुसरा शिक्षक पुन्हा हे सगळे चक्र…. शेवटी हा बिझनेस आहे, आणि ते पगारी कामगार ,त्यामुळे जिथे जास्त पगार तिथे ते पळतात. जेव्हा हे आपली डिग्री खोटी सांगू शकतात, तिथे बाकी सारेच शक्य आहे, नाही का?


या सर्वांमुळे मुलगा आयआयटी-जेईई पार करणे अवघड जाते . मात्र, तरीही AIEEE आणि CET या इतर परिक्षांचे मार्ग त्यांना खुले असतात. पण, अत्यंत दुर्देवाची गोष्ट अशी की, या क्लासेसच्या सांगण्यावरून मुले कॉलेजला दुय्यम लेखतात. वर्षवर्षभर कॉलेजला जात नाहीत. त्यामुळे त्यांना बेसिक नॉलेजही नसतेच नसते. अर्थात, सर्व कॉलेजसचा याला विरोध आहे. पण, सगळेच गेल्याने नाखुषीनेच त्यांनाही हे मान्य कराव लागलं आणि कॉलेज बुडवण्याला परवानगी द्यावी लागते . आणि या सगळया घोळात विद्यार्थ्यांची अवस्था ”ना घर ना घाट का” अशी होऊन जाते.


या सगळयांचे परिणाम विद्यार्थी भोगतात . बर्‍याच विद्यार्थ्यांना आपण फसलोय , हे योग्यवेळी लक्षात येते. पण, त्यानंतर वाट बदलणे तितकेसे सोपे नसते.कारण आजकाल असलेली प्रचंड स्पर्धा ,आरक्षण वगैरे सारख्या गोष्टी यामुळे जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी परिस्थिती झाल्याने तो गेलेला काळही फारच महागात पडतो. त्यामुळे, मग त्याचे भविष्य अंधारमय होते. परगावी आलेल्यांना होमसिकपणा येतो, अभ्यास एके अभ्यास केल्याने सर्वांगीण वाढ तर होत नाहीच( काही काही जण तर राज्य बदलतात .उदा . कोटा किंवा हैद्राबाद) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, त्या नवयुवकाचा आत्मविश्वासच नाहिसा होतो, बाकी सारे मिळेल तो मात्र परत मिळणे फार अवघड…


अर्थात, ”हिरा मातीतही चमकतो” त्यामुळे जे खर्‍या अर्थाने अतिशय बुध्दीमान आहेत ते बहुतेकदा तरतात.पण त्यांच्याही रँकवर फरक पडतो. शेवटी 5,00,000 मुले बसली तरी आयआयटीत 10,000 जणच जाणार आहेत ना? त्यामुळे, टिकणारे कमी आणि गळणारे नेहमीच जास्त असतात. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपला खरा अनुभव सांगायला लोक घाबरतात. कचरतात, कदाचित कारण नसताना तो त्यांना त्यांचा पराभव वाटतो. आणि, त्यामुळे पुढ्च्यास ठेच आणि मागचा शहाणा असेही होत नाही आणि अगदी दरवर्षी एका एका क्लासेसमध्ये हजारे मुले प्रवेश घेतात, त्यांचा ”धंदा” बिनदिक्कतपणे चालू राहतो.

हे सगळे पूर्णपणे थांबवता येईल की, याबद्दल मी साशंक आहे. पण, निदान हा बाजार आटोक्यात तरी आणता येईल. यासाठी, सर्व पातळयांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कपिल सिब्बलानीम ध्ये 80 टक्के मार्कांचा निकष आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाणून पाडण्यात आला . या निर्णयामुळे निदान ही फुग 50 टक्क्यांनी कमी झाली असती. याशिवाय, यासंदर्भात महत्वाची पावले स्वत:च आयआयटी उचलु शकतात. या परीक्षासंदर्भात ते स्वतःच मार्गदर्शन करु शकतात. आयआय ई एल.एस. सारख्या परिक्षांबाबत हा मार्ग उपयुक्तरित्या चालू आहे आणि इंटरनेट सारखे माध्यम असताना बहुतांश ठिकाणी हे शक्य आहे. (नाहीतर वेगवेगळे क्लासेस, ई-पेपर, ई-क्लासेस काढून पैसे कमवत आहेतच की) आणि, यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे समाज. समाजाचा एकुणच या ”आयआयटी” कडे ,क्लासेसकडे आणि आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, तेंव्हा हे प्रश्न आपोआप सुटत जातील.निदान आपले खरे खरे अनुभव शेअर केले तरी फरक पडु शकतो. 14 तास काम करून पैसे कमवणारे यंत्र का एक उत्तम माणूस या दोन पर्यायापैकी जेंव्हा आपल्या पाल्याबद्दल माणूस या पर्यायावर प्रत्येक पालक क्लिक करेल, तेंव्हा सगळचं चांगल होईल.

शेवटी इतकेच की, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण, नजीकच भविष्य ज्या नवयुवकांच्या हातात आहे. त्यांच्या आयुष्याशी या गोष्टी निगडीत आहे. हा! गेली दोन वर्षे मी या बाजारात आहे. कोणत्या जागेवर आहे ते माहित नाही, पण आहे. या दोन वर्षाचा जेंव्हा त्रयस्थपणे विचार केला, तेंव्हा जे जाणवलं ते मांडलं आहे. या विषयात अनेक भाग/मत मतांतरे आहेत. त्यातलं मला जे जाणवलं, जे सार्वत्रिक वाटले ते मांडलं आहे. हेच खरे, असेच करा असा अट्टाहास नाहीच आहे. पण , यावर विचार व्हावा अशी इच्छा आहे. आणि, म्हणूनच पहिल्यांदा मला स्वत: ला माझ्या विचारांशी प्रामाणिक राहता यावं म्हणून माझ्या निकालाआधी हे खरडलं आहे. इतकंच…….. !
विनायक पाचलग
( सदरचा लेख साप्ताहिक साधनाच्या या आठवड्याच्या अंकात प्रकाशित झालेला आहे.)

बोलु कौतुके !!!

>

सदरचा लेख आजच्या सकाळ मध्ये आलेला आहे ,तो लेख तुम्ही येथे पाहु शकता..
http://72.78.249.107/Sakal/1Apr2010/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm                
          गेल्या १५ दिवसात घडलेल्या दोन घटना, मराठीच्या बाबतीतल्या, दोन संपुर्णतः भिन्न क्षेत्रातल्या, पण दोघांमध्ये एकच सामाई़क गोष्ट. दोन्ही उपक्रमातुन दिसते ते आपल्या भाषेवरचे निस्सिम प्रेम. महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव चालु असताना घडलेल्या या गोष्टी आनंददायक आहेतच. पण ज्यांचे तोंड भरुन कौतुक करावे अशाही आहेत.

                यातली पहिली गोष्ट म्हणजे ”मराठी अभिमान गीत”,…….! याबद्दल निदान तुम्ही ऐकले किंवा वाचले असेलच किंवा मग पाहिले असेल यु ट्युब वर.  संगीतकार कौशल इनामदारचा हा ”ड्रीम प्रोजेक्ट” . ३५६ समुह गायक, ११२  गायक, ८ स्टुडिओ या सर्वांनी मिळून बनलेले एक ८.१२ मिनिटाचे एक गाणे .सॉरी, गाणे नव्हे, मराठीचा खळाळता झराच जणू .. नुकताचा  मराठी दिनी विविध क्षेत्रातील  २१  नामवंत लोकांचा हस्ते या गाण्याचे उद्धाटन झाले. या गाण्याची जन्मकथा तसी वेगळी आहे…  खरतरं तमाम रेडिओ वाहिन्यांवर ”मराठी”ला  असलेला दुय्यम मुल्याबद्दल असलेल्या रागातुन या गाण्याचा जन्म झाला. आणि गंमत म्हणजे  परवा जेंव्हा मी माझ्या एका मित्राला याबद्दल विचारले,  (तो रेडिओ मिरचीत ”आरजे” आहे) तेंव्हा त्याने त्याच दिवशी आम्ही ते गाणे आणि कौशलची मुलाखत ऐकवल्याचे सांगितले.  याचा अर्थ गाणे  येताच त्याचा मूळ हेतू साध्य झाला , आणि एखाद्या उपक्रमाची नुसती नांदी होताच त्याने अपेक्षित परिणाम साधावा हे त्या उपक्रमाचे सर्वात मोठे यश असते नाही का, होय ते यश कौशल ने मिळवले आहे.. अभिनंदन कौशल!
                 पण या गाण्याचे कौतुक इतक्याच साठी नाही आहे. कारण हे गाणं इतकं संकुचित नाहीच आहे.. हे गाणं म्हणजे मराठीचा आवाज आहे.  फक्त आपल्या मातृभाषेसाठी ५०० लोकांना एकत्र आणणं.  त्यांच्याकडून गाणं म्हणवुन घेणं, ही खायची गोष्ट नक्कीच नाही.  ”लाभले आम्हास भाग्य” हे तमाम मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करते, त्यांच्य भावना व्यक्त करते.  विठ्ठल उमप ते मुग्धा वैशंपायन आणि शंकर महादेवन ते पं. राजा काळे.  मराठी गानपरंपरा किती प्रगल्भ आणि विविधांगी आहे याचे दर्शन हे गाणे घडवते.  सुरेश भटांच्या  उत्तम बोलानी मराठीची महती सांगायचे आपले काम पुर्वीच केलेले आहे, पण  या गाण्यानं त्या कवितेला आणि त्या भावनांना पुन्हा एकवार जिवंत केलय. महत्वाचे म्हणजे   या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला  कोणत्याही राजकीय  पक्षाचा पाठींबा वा आर्थिक मदत नाही, आली असेल तर ती मदत कौशलने नाकारलेली आहे.  तमाम जनतेने प्रत्येकी ५०० रूपये देऊन हे गाणे तयार झालेले आहे.  म्हणूनच, ते गाणे ”आपले” आहे.  तुम्हा, आम्हा सार्‍यांचे अभिमान गीत. अभिमान गीत म्हणजे नक्की काय असते आणि कसे असावे हे सांगणारे हे अभिमान गीत…
                  खरतर, या उपक्रमाबद्दल मला गेले वर्षभर माहिती होती, पण मी त्यावर लिहीण कटाक्षानं टाळलं होतं. अभिमान गीत ही संकल्पना खरेच उत्तम होती, पण प्रत्यक्षात ते गाणं कस बनतं याबद्दल मला शंका होती.  पण, परवा युटयुबवर ते गाणं पाहिले.  आणि, कान तृप्त झाले.  अभिमानगीत म्हणून नव्हे तर एक ”गाणं” म्हणूनही ते उत्कृष्ट आहे.  त्यात ना आवेश आहे, ना जल्लोष आहे.आहे  ती फक्त प्रसन्नता. मराठीची प्रौढी नव्हे  तर अभिमान आहे.  असे सांगणारी.  कलाकारांची निवड, आणि त्यांना दिलेले शब्द … अहाहा! क्या बात है !!  निहिरा जोशीला दिलेले “लाजते मराठी ” असो  वा विठ्ठल उमापांचा खर्डा आवाज. ” आमच्या पिलापिलात ” असे हळुवार शब्द गाणार्‍या देवकी ताई …  त्याच्या या निवडीला खरोखरच दाद द्यावीशी वाटते.  हे गाणे मी गेल्या १० दिवसात ५० वेळा तरी ऐकले असेल. त्यामुळेच आज जर का मला हे गाणे फक्त  ऐकवलेत, तर मी त्यातली प्रत्येक ओळ कोण म्हणत आहे, ते लगेच सांगु शकतो.  कारण हे गाणं गाताना, करताना ११२ नामवंत आवाज २४  ओळीत सामावताना प्रत्येक गायकाची आयडेंटीटी जपलेली आहे् हे जे मिक्सिंग चे  जे कौशल्य आहे हे खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक प्रकाराला, प्रत्येक पीढीला योग्य संधी मिळाली आहे. खर्‍या अर्थाने हे गाणे मराठीची आयडेंटीटी बनलेले आहे.
                     समजा मला कुणी विचारलं, की बाबा रे, या सुवर्णमहोत्सवी वर्षात काय खास घडले?  तर मी लगेच  सांगेन, आम्हाला आमचे ”गाणे” मिळाले. कोण्लाही दोष न देणारे, स्वाभिमान जपणारे पण त्याचा निखारा न बनविणारे  आमच्या मनातल्या भावना  सांगणारे आमचे गाणे. जेव्हा एखादा माणूस तन मन धन अर्पुन एखादी कृती घडते तेव्हा त्याचा परिपाक काय असतो याचा वस्तुपाठ घालुन देणारे ही कलाकृती …
या आनंदातुन बाहेर पडतोय ना पडतो तोच १ मार्चला आम्हा ब्लॉगर्सचे संकेतस्थळ ”मराठी मंडळी” चा श्रीगणेशा झाला.
                        गेले कित्येक दिवस तुम्हा, आम्हा सार्‍यांच्या कानावर पडणारा ब्लॉग हा शब्द. प्रसन्नने युव्या अभिव्यक्ती तल्या लेखातुन ब्लॉग विश्व काय ते उलघडवुन दाखवले आहेच. पण योगायोगाने त्यानंतरच्या आठवड्यात आम्ही ब्लॉगरनी एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले. आम्ही सारे ब्लॉगर जगाच्या विविध भागातले, विविध वयाचे, आम्ही लिहित होतो ते आमच्या सुखासाठी, इतकेच काय, तर आमच्या लिखाणाबद्दल चर्चा करायचो. ऑनलाइन कट्टे जमवायचो, आणि मग कोणत्याही भल्या बुर्‍या विचारावर बिनधास्त चर्चा करायचो. आणि, अचानक अशी जाणीव झाली की आज जवळ जवळ ५००० ब्लॉगर आहेत. सगळे आपल्या भाषेविशयीच्या अनाम ओढीने लिहिणारे. पण जर आपण संघटीत झालो, तर ब्लॉग हे आपल्या भाषेच्या आणि आपल्या सर्वांचच्या विकासाचे प्रभावी माध्यम बनु शकते. हाच विचार पुढे आला आणि १७ जानेवारीला पहिला मराठी ब्लॉगर मेळावा पुण्यात झाला. एकमेकाना लेखातुन भेटणारे लोक प्रत्यक्षात भेटले, आणि काहीतरी ठोस करायचे असे ठरले, आणि अवघ्या १ महिन्यात आम्हा ब्लॉगर्सची हक्काची जागा आम्हाला मिळाली, हीच ती आमची साईट ” मराठी मंडळी”…
                        नक्की काय आहे ही मराठी-मंडळी ? तर सर्व ब्लॉगर्सना एकत्र आणणारे एक ठिकाण. आजपर्यंतजे ब्लॉगर वेगवेगळ्या बेटांवर लिहित होते. त्यांचा एक समुह. या साईटने मराठी नेटविश्वात प्रचंड बदल घडवले आहेत. येथुन पुढच्या काळात अनेक उपक्रम या साईटमार्फत चालवले  जाणार आहेत. जुन्यांचे एकत्रीकरण आणि प्रत्येक नव्या मराठी ब्लॉगरला मार्गदर्शन अशी दुहेरी भुमिका ही साईट पार पाडणार आहे. आपल्या मराठीला आपण कसे जपु शकतो, त्यासाठी या माध्यमाचा पुरेपुर वापर कसा करु शकतो, याचा विचार यात झालेला आहे. म्हणूनच आमच्या लेखांबरोबरच जुन्या जात्यावरच्या ओव्या, काही म्हणी, शब्दप्रयोग या सार्‍यांनाही येथे स्थान मिळालेले आहे. थोडक्यात काय, तर एका चांगल्या कामासाठी काही मराठी माणसे एकत्र आली आहेत, त्यांचे हे कुटुंब बनले आहे. या संस्थळाचा उद्घाटन सोहळाच या कुटूंबाची एकी दाखवणारा होता. १ मार्च ला रात्री १०. ०३ मिनिटानी आम्ही सुमारे १०० ब्लॉगर एकाचवेळी ऑनलाईन आलो आणि सर्वांसमक्ष ही साईट चालु केली गेली. आहे ना भन्नाट? त्याहुन गमतीची गोष्ट अशी की त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यात भुर्जपत्र ते ब्लॉगपेज  असा परिसंवाद रंगला होता, तेथे अनिल आवचट यानी हे संकेतस्थळ चालु झाल्याची घोषणाही केली. साहित्याची जपणूक आणि गुणात्मक वाढ हा एक प्रमुख हेतु ही साईट ठेवताना होता, आणि वरच्या उपक्रमाप्रामाणे नुसती नांदी होताच मराठी मंडळीला  साहित्य संमेलनातील वरच्या परिसंवादात स्थान मिळाले, हादेखील या मध्यमाच्या यशाचाच पुरावा, पण त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे, आणि त्याची जाणीवही आम्हा सर्वांना आहे.
                           या साईटची जन्मकाहाणी तुम्ही पाहिलित, पण वर  हीदेखील  एक नवी सुरूवात आहे.  मी स्वत: गेली 1½ वर्षे ब्लॉगींग करत आहे.  कारण, ब्लॉग हे नव्या पीढीचे माध्यम आहे  त्यात प्रचंड ताकद आहे.  फक्त इतके दिवस ही ताकत विखुरलेली होती.  ”ब्लॉगर मेळयावाने” ती ताकद एकत्र आली.  आणि ब्लॉग हे एक नवे माध्यम म्हणून समोर आले  आणि त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी होत आहे, ही नक्कीच चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे, नाही का? महत्त्वाचे म्हणजे सर्वसमावेशकता हा महत्त्वाचा निकष अगदी सुरवातीलाचा या मंडळीनी पुर्न केला आहे.  कोण नाहीय या मंडळीमध्ये?  ७० वर्षाचे गृहस्थ आहेत ते माझ्यासारखा १६ -१७ वर्षाचा तरूण आहे.  कोल्हापूर ते कॅलिफोर्निया असे सगळीकडचे मराठी बांधव इथे आहेत.  ”जात्यावरच्या ओव्या” ते उद्याचे भविष्य ”आयपॉड” सारे, सारे काही त्यात आहे. हे सर्व करताना कोणताही स्वार्थ, स्वत:चा फायदा नाही, एका अनाम प्रेमापोटी, कोणीही नेता नसताना  हे सारे होत आहे.  कधी नव्हे ते इतकी मराठी माणसे एका ध्येयाने एकत्र आलेली आहेत.  हाताशी ”नेट” हे प्रबळ माध्यम आहे.  मिडीयाचे सहकार्य आहे.  आणि, म्हणूनच मला असा विश्वास आहे,  की मराठीची ही गंगा वाहून नेण्याचे हे काम ही साईट आणि आम्ही ब्लॉगर नक्कीच पार पाडु.
                               हा! तुम्हाला आता प्रश्न पडला असेल.  की बाबा रे, म्हटले तर ते एक गाणे आणि ही एक साईट …. ! मग त्याचा एवढा उदो-उदो कशाला. त्यांची जन्मकहाणी वगैरे कशाला ऐकवत आहेस आम्हाला? बरोबर आहे !  पण त्या ८-१२ मिनीटाच्या गाण्याने आणि या १७ इंची स्क्रिनवर दिसणार्‍या मजकुराने लोकांच्या विचारात बदल घडवून आणला आहे.   अभिमान गीताने मराठी कशी जपता येते याचे उद्दम उदाहरण घालुन दिलेले आहे. तर त्या साईट ने माध्यम कसे वापरावे हे सांगितले आहे. मग याना त्यांच्या माध्यमात बंदिसत ठेवावे का? नक्कीच नाही. कारण त्यांच्यात परिस्थिती बदलवण्याची ताकद आहे. असे म्हणतात की  साहित्य, कला यातुन समाजाचे प्रतिबिंब प्रकट होत आहे आणि ”मराठी” म्हणून असे हे एक सर्वांगीण, सर्वांगसुंदर प्रतिबिंब आता पडायला लागलेले  आहे.  आणि, म्हणूनच या प्रतिबिंबाचे कौतुक करणे गरजेचे आहे कारण ”भूर्जपत्र ते वेबपेज” असा झालेला प्रवास हा खर्‍या अर्थाने मराठीचा भाग्योदय करणारा  आहे. हा प्रवास जर असाच चालु राहिला तर
माझ्या मराठीचचे बोलु कौतुके |
परि अम्रुतातही पैजा जिंके ||
ही वाणी खर्‍या अर्थाने खरी ठरणार आहे. आणि त्या आशेपायीच मी हे कौतुकाचे बोल लिहिले आहेत.   आता फक्त इतकीच इच्छा आहे की, ज्याप्रमाणे अभिमान गीतात ५00 आवाज ऐकूनही ”एकसंधता” कुठेही तुटलेली नाही तशी ही मराठीची एकसंधता तुटू नये, सर्व क्षेत्रात हे चैतन्य, हा  एकसंधपणा असाच वाढत जावो… आणि तमाम जनतेत आपली मराठी अशीच बहरत राहो, बरोबर ना?
विनायक

काल आज आणि उद्या

>

     

रंगकर्मी .कॉम साठी मी लिहिलेले हे संपादकीय, जरुर वाचा
तुमचे मत तुम्ही इथेही देऊ शकता

     
गेल्याच आठवडयात ”रंगकर्मी.कॉम” ला सहा महिने पूर्ण झाले.  इंटरनेट आणि नाटक यांना जोडणार्‍या या उपक्रमाचं या कालावधीत लोकांनी उत्स्फूर्त  स्वागत केले.  जवळ जवळ 34 देशातील हजारो लोकांनी ही साईट पाहिली.  आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रंगकर्मी हे नाव नाटकवाल्याना आणि इतराना ओळखीचे झाले,अर्थात रंगकर्मीचा एक प्राथमिक टप्पा पुर्ण झालेला आहे. म्हणूनच  गेल्या सहा महिन्यांचे सिंहावलोकन व यापुढील रंगकर्मीची दिशा ठरविण्यास  हीच वेळ योग्य आहे, असे आम्हाला वाटते.

              माणसाला खर्‍या अर्थाने ज्या गोष्टी समृद्ध बनवतात त्यात नाटकाचा समावेश होतो ,आणि महाराष्ट्रात तर नाटक हा सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे अर्थातच, ” मराठी नाटयक्षेत्र” हे प्रचंड विस्तारलेले आहे.  दुर्देवाने, मराठी नाटकाला इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न पूर्वी कधीही झाला नव्हता.  म्हणूनच, ”इंटरनेट” या माध्यमाचा वापर करून सर्व रंगकर्मींना, नाटयरसिकांना एकत्र आणावे, त्यांच्यात देवघेव होऊन नाटकाची प्रगती व्हावी या उद्देशाने ”रंगकर्मी” तयार केली गेली.  इंटरनेट माध्यमाचे वैशिष्टय असे की त्याला स्थळकाळाचे बंधन नाही.  कोणीही व्यक्ती, कोठूनही यात सहभागी  होऊ शकते. या ताकदीचा उपयोग  रंगकर्मीना एकत्र आणण्यासाठी होऊ शकतो  हे जाणून  त्या दृष्टीने  रंगकर्मीची निर्मिती व आजचा प्रवास सुरू आहे.
                  हे करताना मराठी नाटकाची आजची स्थिती समजून  घेणे गरजेचे आहे. आजचे मराठी नाटक हे विविध मतमतांतरानी भरलेले आहे. अर्थात कोणत्याही कलेला अशी मतांतरे चुकलेली नाहीतच. व्यावसायिक – प्रायोगिक असे भाग, प्रस्थापित व इतर असे विभाजन , निदान तसे भासवणे, केंद्रीकरण झाले असल्याची ओरड, पुरस्कारावरून वाद असे अनेक कंगोरे त्यात आहेत.  अशा प्रकारचे मतभेद असणे, आपापल्या महत्वाकांक्षा असणे, हे एका अर्थाने सजग, जागृत समाजाचे लक्षण आहे.  मात्र, त्यात सर्वाला एक मर्यादा असणे गरजेचे आहे.  या सर्व घटकांना एकत्रित ठेवून ”नाटका” च्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे, ही आजची गरज आहे  असे यातून दिसून येते  व त्याचवेळी या सर्व घटकांची अभिव्यक्ती मरू नये याचीही काळजी घ्यावयाला हवी हे जाणवते .  रंगकर्मीची वाटचाल ही याच दिशेने सुरू राहील, अशी ग्वाही आम्ही देतो.  याचवेळी प्रस्थापित, इतर असे  भेदभाव न करणारी आमची भूमिका   असेल हेही स्पष्ट करतो. ‘आपण सारे रंगकर्मी आहोत!” एवढी एकच भावना जपण्याचा प्रयत्न आम्ही करु .  मात्र अशा मतभेदांवरील लिखाण जरुर प्रकाशित केले जाईल, ज्यायोगे, प्रत्येकाची मतमतांतरे एकमेकाना समजतील .  लेख, त्यावर उमटणारे प्रतिसाद ही एक प्रोसेस आहे.  ज्यामुळे एकमेकांचे विचार कळतात व एकत्रितपणे पुढे जाण्यास मदत होते, असे आम्हाला वाटते  . सर्व वाचकांना मुक्त प्रतिसादाची सोय यासाठीच करून  दिलेली आहे.
                         खरं सागायचं तर, प्रस्थापित प्रसारमाध्यमांवरची चीड हा ”रंगकर्मी” च्या निर्माणातला   एक छोटासा पण महत्वाचा घटक आहे.  वेगवेगळया कारणांमुळे का असेना.   पण, सध्याची माध्यमे ”नाटक” या कलेला पुरेसा न्याय देत नाहीत, असा एक  मतप्रवाह  आहे. नाट्यरंग बंद पडल्याने आमच्या या विचाराला पुष्टी मिळालेली आहे . त्यामुळेच  नाटकाचा इतिहास जपणे, ज्यांना योग्य प्रसिध्दी वा ओळख मिळालेली नाही त्यांना ती  मिळवून देणे हे मुद्दे स्वाभाविकपणे ”रंगकर्मी”च्या अजेंडयावर आलेले आहेत.  चर्चा, मुलाखत, लेख इ. माध्यमातून ”रंगकर्मी”ला नाटकाचा आवाज बनविणे आणि नुसते ओरडण्यापेक्षा स्वत: कृती करणे हेच यामागचे उद्दीष्ट आहे.
                         रंगकर्मीची भविष्यातील वाटचालही याच दिशेने होईल अशी आमची आशा आहे .  येत्या काही दिवसात केल्या जाणार्‍या विविध उपक्रमामध्ये ”नाटकासंबंधात घडणार्‍या चांगल्या गोष्टी लोकापर्यंत पोहोचवणे” हे महत्वाचे तत्व आम्ही जपणार आहोत. एखाद्या कलेचा विकास होताना त्यात गुणात्मक वा संख्यात्मक वाढ अपेक्षित असते.  त्यामुळे, एखादी गोष्ट जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचविण्याद्वारे संख्यात्मक वाढ करणे आणि लेखांचा दर्जा ,त्यावर होणारी चर्चा ,वैचारीक वाद याद्वारे गुणात्मक वाढ व्हावी  अशी आमची अपेक्षा आहे.  ललित, वैचारिक लेख, विविध संस्थांच्या, कलाकारांच्या ओळखी, नाटकांची परिक्षणे, असे विविध मार्ग यासाठी वापरले जातील.  ज्यामुळे, खर्‍या अर्थाने रंगकर्मींना एकत्र व्हायला मदत होईल व त्यांना त्यांच्या भावनाही व्यक्त करता येतील. आजच्या रंगकर्मींना हेच हवे आहे असे आम्हाला वाटते.
                           ”रंगकर्मी” चालवताना आमची भूमिका ही अशी राहील.   याशिवाय, दरवेळी ”संपादकीय” च्या माध्यमातून भूमिका मांडली जाईलच ,नाटकाला जपण्यासाठीचे एक सजग माध्यम, असाच आमचा या वेळी पवित्रा राहील.  मात्र, हे सर्व करत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.  ती म्हणजे तुमची साथ…..! कारण, हा केवळ एखाद्या  व्यक्तीचा, एखाद्या भागाचा उपक्रम नसून तो आपल्या सर्वांचा उपक्रम आहे.  आपण यात सहभागी व्हावे यासाठीचे सर्व प्रयत्न आम्ही केले आहेत.  ”रंगकर्मी” ची सदस्यता स्विकारुन आपण आपले मत, विचार इतर लोकांपर्यंत   पोहोचवू शकता.  अपल्या संस्थेबद्दलची उपक्रमाबद्दलची माहिती तुम्ही देऊ शकता.  इतकेच काय आपली कलाकृती (नाटक वा एकांकिका) ही तुम्ही लोकापर्यंत पोहोचवू शकता.  अगदी कोणालाही हे सर्व करता यावे.  यासाठी अत्यंत सोपा ”इंटरफेस” आणि, ”मराठी टायपिंग” अशा गोष्टीही आम्ही पुरविलेल्या आहेत.  तरीही नाही जमले, तरीही आपले लिखाण, लिखित स्वरूपात आमच्यापर्यंत पोहोचवले, तरीही आम्ही ते प्रकाशित करू. शेवटी हे एक व्रत आहे आणि त्याचा गाभा हा तुम्ही आहात.
शेवटी इतकेच, एका भल्या हेतूने,  कोणत्याही फायदाच्या अपेक्षा न ठेवता हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे.  नेटच्या माध्यमात नाटकाची पालखी  वाहणे, हे प्रचंड जबाबदारीचे काम आहे.  याची जाणीव आम्हाला आहे.  मात्र, आपण सारे मिळून  हे करू शकतो, असा विश्वास आम्हाला वाटतो .  ”नेट” ही काळाची गरज आहे  व ती ओळखून आपण पावले  टाकलेली आहेत.  आता काम आपल्या सार्‍यांचे आहे.  काहीतरी चांगले करायची संधी आपल्याला मिळाली आहे.  तेंव्हा आपापल्या परीने प्रयत्न करून आपल्या सर्वांच्या ”रंगकर्मी”ला आपण वाढवूया. ज्यायोगे नाटकाला एक नवी  पालवी फुटेल आणि आम्हाला वाटते, हेच समाजाच्याही हिताचे आहे . तुमचा सक्रीय सहभाग व पाठिंबा असू द्या एवढीच विनंती …….!”

- संपादक
रंगकर्मी .कॉम

>हा आमचा आवाज नाहीच …

>नमस्कार
मध्यंतरी सकाळ मध्ये एक लेख आला होता
हमारी जनरेशन की आवाज सुनो म्हणून…
हा लेख इथे पहा
http://72.78.249.107/esakal/20100201/5223598555223866545.htm
त्या लेखाला मी दिलेले हे उत्तर
वरील लेखावर आणि माझ्या लेखावर तुमचे मत काय आहे हे जाणुन घ्यायची प्रचंड इच्छा आहे….
पहा माझे मुद्दे पटतात का…
सध्या टायपिंग ला फ़ार कमी वेळ मिळत आहे ( अभ्यासामुळे ) तेव्हा समजुन घ्या….

हा आमचा आवाज नाहीच ...
सकाळ मधलाहमारी जनरेशन की आवाज सुनो.” हा  लेख वाचला होता  आणि  गेल्या दोन रविवारी त्यावर आलेले विविध प्रतिसादही वाचलेआणि गेल्या दीड महिन्यात एकच गोष्ट जाणवली कीहा आवाज आमचा नाहीय ….” खरेतर हा लेख आणि त्यातले विचार मला अजिबात पटलेले आणि आवडलेले नाहीतमात्र, लेखकाच्या मतस्वातंत्त्र्याचा कोणीही आदर करायला हवात्यामुळे मी माझ्यापुरते हा विषय संपला होतामात्र सलत होती ती वेगळीच गोष्ट.. सकाळने या लेखालाप्रातिनिधीक मतअसे Exposure दिले होतेप्रातिनिधीक मत याचा अर्थ ते एकाचे मत रहाता एका विशिष्ट वर्गाचे मत होतेअशावेळी मात्रगोष्टवेगळी होते

या संपूर्ण लेखाचे स्वरुप पाहता त्यात एक नाराजीचा सूर ठासून भरलेला आहेयाशिवाय, पालकांना असंख्य उपदेशही केलेले आहेतआणि, त्यच्या पाठिंब्यासाठी लेखिकेने काही चांगल्या पालकांची उदाहरणे दिलेली आहेतअसो, तीला तसे अनुभव आले असतीलपण, आज समाजात हीच परिस्थिती आहे कानाहीया लेखात दिलेली उदाहणे ही प्रातिनिधिक असु शकत नाहीत, असा हजारात एखादाच पालक असतो की  ज्याला आपल्या मुलाने विषय सोडला आहे हे माहित नसते. पण त्यावरुन सगळ्यानाच मुर्ख ठरवणे किंवा त्या उदाहराणाचा उअपयोग करुन  जनरलाइज्ड विधान करने हे योग्य नव्हे. या लेखातील भाषाही  तमाम पालकांनाच मूर्ख ठरविणारी आहेआणि, यातले अनेक प्रसंग हे अति झाले आहेत हे कोणीही मान्य करेलजनरल विचार करता इतकी टोकाची भूमिका घेणारे लोक फार कमी आहेत.मग  त्यासाठी सगळयांना दोष का?
 तसे पाहिले तर अशी अनेक प्रश्नांची जंत्री उभी करता येईल?आणि त्याला उत्तरेही देता येतीलपण त्याहून मोठा आणि महत्वाचा प्रश्न उभा राहतोकी सकाळमध्ये इतक्या मोठया प्रमाणावर लेख प्रसिध्द करण्यामागे उद्देश काय?”  हा उद्देश मला कालपर्यंत कळाला  नव्हताकाल लेखिकेनेसुसंवादअसा डिक्लेअर केल्यावर तो समजलापण, खरे सांगायचे तर हा लेख त्या निकषावर संपूर्णत: अपयशी ठरतोया लेखामुळे, मुले आणि पालक यांच्यातील दरी वाढण्याला मदतच होणार आहेअशा अशाल्घ्य  भाषेत लिहिलेले हे विचार ऐकून अनेक पालकांच्या मनात चिंताचे, शंकेचे वादळ उठणार नाही काइतके विचार ऐकल्यावर कोणताही पालक आपल्या मुलांशी यावर चर्चा करायला धजेल काकाही पालक चर्चा करतीलही , पण ज्यांच्यात अशी चर्चा घडणार  नाही, त्या पालकांनीमाझेच सारे चुकलेम्हणून कुढत रहायचे कानिदान हा लेख तरी तसे भासवतो.

अजुन एक महत्वाची  खुपणारी गोष्ट म्हणजे या लेखातील Rude भाषाखरच का हो आम्ही तरूण अशी  भाषा वापरतो?निदान पालकांबरोबर तरी नाहीमग अशा लेखातून आजच्यातरूणाईचीअशी इमेज का निर्माण करायचीत्याहून महत्वाची गोष्ट अशी की, जनरेशन गॅप ही दर पिढयात असणारच आहे…. ! जशी आम्हा तरूणांची बाजू आहे, तशी पालकांचीही असणार आहे, आणि त्यांचेही काही मुद्दे बरोबरच असणार आहेतमहत्व आहे ते यातुनसुवर्णमध्यकाढायलायुवा पिढीची एक सुजाण प्रतिनिधी म्हणून या लेखाचा रोख त्यादिशेने असू नये काफक्त विविध मुद्दे सांगून ही परिस्थिती सांगणे काय गरजेचे आहे, आणि यातले बरेचसे मुद्दे हे पालकांना आगोदर माहित आहेतच कीखरेतर, आपणच आपल्या पालकांशी खुलेपणाने बोललो तर असे प्रश्न सोडविता येतत (उदा. लेखातील बायोलॉजीचे उदाहरण).पण आपण बोलत नाही. ही अस्वस्थता यायला जसे पालक जबाबदार आहेत तसे आपणही आहोतआणि, एक तरूण असूनही मी हे मान्य करत आहे. कारण ते सत्य आहे. आणि म्हणूनचसकाळसारख्या वृत्तपत्राने यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा होती अजुनही आहे.
महत्वाचे म्हणजे मी हे पालकांच्या बाजूने बोलत नाही आहेपालकांचे ही काही चुकत आहेच, लेखातील काही मुद्दे बरोबर आहेतपण त्यांची तीव्रता किती, आणि ते सोडवावे कसे यावर विचार करणे हे दोघांच्या आणि  पर्यायाने समाजाच्या हिताचे आहे.
 माझ्या वरील सर्व मताना हे तुझे एकट्याचे मत आहे असे उत्तर देउन गप्प करता येते. मान्य ,१०० % मान्य. पण मी सुद्धा  हे त्या लेखिकेचे मनोगत असते, तर  आनंदाने वाचले असतेपण, जेंव्हा त्यालाएखाद्या जनरेशनचाआवाज म्हटले जातेतेंव्हा, ”हा आमचा आवाज नाहीअसे त्याच जनरेशनचा एक घटक म्हणून मला सांगावेसे वाटतेआणि मग त्याला वैयक्तीकतेची किनार राहत नाही.

जाता जाता एक छोटीशी गोष्ट, सध्या मी बारावीत शिकतोसर्व शालेय परिक्षातून चांगले यश मिळवलेले आहेतरीही, अभ्यास बरोबर विविध वृत्तपत्रातून लिखाण करतो, इतकेच काय, तर मराठीतले नाटकावरची पहिली साईटही चालवतोआणि याला माझ्या घरून शून्य विरोध आहेयाचा अर्थ प्रस्तुत लेखिका आणि मी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी एकच आहेअसे असूनही आमच्या मतात इतकी भिन्नता आहेमग सदरचा लेख आमच्या जनरेशनचा आवाज कसा असु शकतो बरे?

>Open Letter to Chetan Bhagat

>


मित्रानो ,सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास पुर्वी सांगितल्याप्रमाणे माझ्या चेतन भगत वरील लेखाचे ईंग्रजी भाषांतर मी येथे देत आहे ,साप्ताहिक साधनाने हे भाषांतर केलेले आहे.
Hi Chetan, frankly speaking I was not going to write a letter to you. I was planning to just mention a twit; ‘I liked your book’ and that would have been sufficient. But all that I desire to convey to you, cannot be accommodated in only 140 characters and hence this letter. In fact, I got acquainted with you through an article two years ago and since then I was your fan; I am your fan even today and may continue to be. Naturally, it goes without saying that I have read all of your books. In the same context, I am going to talk with you today.

So, what I wish to tell you is, recently I read your fourth book : ‘Two States’. You have described well – the story of a marriage in that. Since it is your own story, it has been expressed equally nicely indeed. People will like this story for sure and congratulations for that. But to tell you the truth, I did not at all like it as a book. This book of yours is nothing but a screenplay of a film only. And you have thrown that heap on our face before handing it over to a director. Of course, a film will be made on it. But friend, a book getting published based on a film is different than selling the story of a film in the form of a book. All the happenings, castings are no different than a film, my friend. You must be aware that several such love stories keep happening on streets. Watching them in the form of a film for whiling away  three hours is different and what’s the meaning in sparing time to read the same thing in a book ?. Merge four films and your book is made. My contention is not toward writing such stories. One can necessarily write such stories but what was indigestible to me is the way it has been written and the kind of happenings are intentionally stuffed in that.
Really, we – the youngsters – liked you immensely. We admire you because of your skill of telling a story. Your simple and young flare of the language abundant of ‘fuck’, ‘suck’ etc and the novelty of different subjects of your stories in spite of the fact that in last three books, you have told the same story. Three friends, one God-man, and some happening. Even if it is Rhyn from ‘Five Point Someone’ or the call-centre people or the story of Govind. The same thing kept recurring across the three stories. They attempted to do something out of the world; but they could not do it and then either the God came to their rescue or sometimes their own conscience. And then they improved and finally a happy endings as usual. One love story coupled with an adult paragraph and that’s it. But we read it all and admired it overwhelmingly. Even today they are leading on the list of best sellers. It happened, because you altered the background of the story to some extent and exposed some new spheres. This we liked, but frankly speaking the level of your writings deteriorated after every book. Now that language of C-Word, F-Words has also lost its fascination and we don’t experience anything new in it. The kind of change that needs to occur in your stories too does not seem to be taking place. In fact, in your fourth book, you have tried to merge four stories of four different films. Of course, you have tried to give a message but it becomes quickly apparent that you have yourself not understood that message as yet. Then why this insistence ?. Why is that so, Chetan ?.
I know your MBA style answer on this. ‘I give people what they like. Reader’s taste dropped and therefore even I dropped my level’. Quite right, the overall taste has really dropped everywhere. But my dear Chetan, you indeed hold the strength to change all this. Today, ‘Chetan Bhagat’ has become a brand in itself. Why did I not write this letter to Arvind Adiga ?. I won’t. Because you possess the strength to change the taste of people, he doesn’t !. Today, people buy ‘Chetan’s book’ without even glancing at the material in it. That’s the kind of confidence you have gained. Then why can’t you bring about a change in your reader’s taste. You assert, ‘I want to become an element of the new India and play a role in shaping it’. Then why don’t you use your potency to tell a story for that purpose ?. Why can’t you impress upon the people some such thought that you have understood and felt appealed and above all it is useful for the young generation ?. You did make an attempt of that kind to some extent but not only did it fail to render a message but on the contrary  the whole story itself collapsed. Will you be able to tell an immortal story ?.
Today we do read your stories but fail to even remember the characters in it barely after a week also. Will this not make an impression that what the youngsters like to read is worth forgetting in four days and it is something that does not have any ‘book value’ ?. And then in order to recall your story, we should go and watch the movie (3 Idiots, hello !). Should we not at all expect some quality writing from you that captures a remote corner of our mind ?. Please find time to answer this question once for all.
Feel free to write films. No issues with it. We won’t mind watching them even by buying a ticket of Rs. 200. But you ought to know that entertainment is secondary in life. It is only a mean and not an object. When will you write about your goal in life, about the thrill involved in meeting it and about the sheer charm involved in life ?. Or is all your future writing shall be full of ‘love stories’ coupled with unimaginable circumstances or about the artificial world like the call centres ?. We desire to read something new, something nice from you. Today’s youth is lacking a goal worth it. He has no fulfilling desires left to achieve anything and he has forgotten the excitement involved in a dedicated effort. All of them need to know this and only you can tell it to them. You are representing both the institutions founded by the early political leaders of India for ensuring the bright future of this country. You are gifted with the strength of expressing yourself. Why don’t you use that here ?. Writing films for earning livelihood is different and deploying your art for that is different. Come out of these films and give us something Quality Classic !. Give us some inspiration and only you can do this. You can imbibe even simple things on our minds because……Young India loves to hear you.
You may not even know that I am your follower on Twitter but I do read your twits regularly. I feel disheartened to read your twits on MNS with Sucks and Fucks. Is our hero so instable intellectually ?. One really good common factor among all of your four books is that all their heroes attempt to challenge the prevailing system ?. It is quite right that you desire to give that as a genuine thought of yours but at the same time each of your heroes gets defeated in his rebellion against the system and then somebody else comes up to help him. Is the young generation of today indeed like this ?. Then why do you portray such a picture ?. And if at all it is really this way, isn’t it necessary to alter this scene ?. Are all of your twits and even your article in the Times of India an intelligent mean of cashing the opportunity offered by the controversial issues of regional linguistic pride ?. Hope this is not a part of what they teach at MBA ?.
I know I am crossing my limits of etiquettes and perhaps I could be wrong in my interpretation also because my abilities to understand and analyze you too could be very low. But frankly speaking, all of this has born out of the grave distress of not meeting the expectations you had aroused. I do not know how I felt so affectionate toward you to ultimately write a letter. It could be because even I am dreaming to study at IIT. But I am indeed confused whether I should keep such expectations from my hero or should I be so upfront and blunt with you or alternatively, should I keep searching some message in this kind of a ‘Movie Style’ book ?. Or should I simply assume that there does not exist any such concept like a ‘Message’ and neither does there exist anybody really capable of offering a direction and the writings are essentially meant exclusively for entertainment ?. At least, should I conclude this way about you.
Please feel free to comment. Forget about the ‘Young India’, at least I want to learn from my idol. Anyway, It’s better I stop now instead of talking in excess except saying,
‘I am waiting’
- Vinayak Pachalag

>थर्ड आय

>

                      ”मला 3 Idiots संपूर्ण अगदी फ्रेम टू फ्रेम आवडला”  अर्थात, बर्याच जणांना माझे हे विधान अतिशयोक्त वाटेल, नव्हे ते आहेच.पण हेच सत्य आहे.अहो, सचिनच्या सर्वोत्कृष्ट इंनिगमध्ये एखादा बॉल त्याला खेळायला जमलेला नसतोच की!  तसा एखादा दोष इथेही आहे, पण बाकी, ऑल ईज वेल. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाने समाजात जी चर्चा घडवली त्यामुळे  तर तो  मला आधिकच आवडतो.  हां, आता तुम्ही म्हणाल की काय हे पुराण लावलय, दिसेल तिथे 3 Idiots वरचे लेख वाचून आम्ही कंटाळलोय आता!  बरोबर आहे, पण  वाहत्या प्रवाहात हात धुवुन घेणारा हा लेख नाही आहे.  या सगळया  मधल्या काळात झालेल्या चर्चात वगैरे अनेक मुद्दे समोर आले.  नकळतपणे अनेक बेसिक प्रश्नावर चर्चा झाली आणि, त्यासाठीच हा सगळा धुरळा खाली बसल्यानंतर, म्हणजे आता, काही गोष्टीवर खरीखुरी, सांगोपांग चर्चा  करण्याची,पुर्वी मांडलेली मते योग्य होती का? हे तपासण्याची वेळ आलेली आहे.



                     तसं, बघायला गेलं, तर 31 डिसेंबरपर्यंत सगळ ऑल इज वेलच चालु होतं. पण त्याचदिवशी चेतन भगतने त्याच्या ब्लॉगवर एक पोस्ट टाकली, आणि ठिणगी पडली.  बाकी मग मिडियाने त्यात तेल घालणे .  नंतर चेतनची माघार. इ. इतिहास तुम्ही जाणताच.  पण मला खरे खरे  सांगा मित्रांनो, तुम्हाला फाईव्ह पॉइंट समवन  पेक्षा 3 Idiots सरस वाटत नाही का ?  मला स्वत:ला तरी असे वाटते की,चेतनला आपल्या पुस्तकातुन जे सांगायचे होते, ते चित्रपटातून जास्त प्रभावीपणे मांडले गेले. पुस्तकं वाचताना शेवटपर्यंत आपल्याला त्यातला संदेश हुडकावा लागतो.  पण, चित्रपटात ”कायमाबी के नही, काबिलियत की पीछे भागो” हा संदेश सतत अंडरलाईन होतो.  मनावर बिंबतो .हा! याला तुम्ही चित्रपट या माध्यमाची ताकद म्हणू शकता.  पण,ते तसे नाही आहे, तसे असते तर ”हॅलो” सुपरहिट झाला असता.  कादंबरीची कथानकाच्या दृष्टीने बदल करणे, नवीन पात्रे इ. बाबतीत जे उत्तम बदल केले गेले.  त्यामुळे, पुस्तकाच्या 100 पट नवीन पटकथा उत्तम झाली आहे .  कदाचित,यासत्याची जाणीव झाल्यानेच आपले या कथेबाबतचे अस्तित्व रहावे यासाठी चेतनने हा वाद केला असावा.पण माझ्यासारख्या त्याच्या खर्या  चाहत्याना मात्र असेच वाटते की त्याने असे करायला नको होते ,कारण आपलाच मुद्दा एखादी व्यक्ती अतिशय प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवत आहे ,तीही आपल्याच परवानगीने ही कोणत्याही लेखकासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. असो, शेवटी चेतन ने निदान माफी मागण्याचे तरी शहाणपण दाखवले.   काही लोकांना हा मुद्दा  Publicity Stunt वाटला. पण  तो तसा स्टंट नाही  म्हणून आमिरने त्यावेळी  घेतलेली ”आत्ताच काही बोलणार नाही” ही भूमिका खरंच कौतुकास्पद आहे.  त्यामुळे,या सगळ्यासाठी  आमिर आणि 3 Idiots चे मराठी लेखक  अभिजीत जोशी यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.


                            हा वाद संपतोच ना संपतोय, तोवर देशभर आत्महत्या सत्र सुरू झाले, आणि काही जणांनी याचे खापर 3 Idiots वर फोडले.  जसा पूर्वी ”एक दूजे के लिए” आत्महत्येला कारणीभूत ठरला. तसा, यातील प्रसंगामूळे मुले आत्महत्या करत आहेत, उद्युक्त होत आहेत. असे म्हणले गेले, असेलही कदाचित.  पण, फ्रेंडस आपला बघण्याचा ऍंगल थोडासा बदलुन बघा बर!   3 Idiots मुळे  मुलांना प्रेरणा मिळाली हे मान्य, पण आत्महत्येचा निर्णय काही एका रात्रीत होत नाही.  याचा अर्थ, एवढी मुले आतल्या आत मानसिकदृष्टया मेलेली होती, त्याचे काय? आज भारतात केवढया मोठया प्रमाणवर लहान मुले वेगवेगळया दबावाखाली झुरताहेत,जळत आहेत त्याचे एक विदारक चित्र या चित्रपटामुळे आपल्या समोर आले. त्याहुन खेदाची बाब म्हणजे, त्यानंतर आलेल्या चर्चेच्या, लेखांच्या उधाणात या मुळ गोष्टीवर चर्चा झालीच नाही.  झालीच तर दुर्लक्षीत राहिली.  पण, शिक्षणपध्दती ,नातेसंबंध असे बेसिक प्रश्न ज्यामुळे कोवळया कळया खुडल्या जात आहेत.  त्यावर उहापोह नको व्हायला?  या सर्वांवर काही लाँग टर्म उपाय करायला नकोत का? बघा, तुम्हाला काय वाटतंय ते?


                      असेच काही प्रश्न त्यातली रँगिंग, बलात्कार भाषण आणि गर्भारपणाचा प्रसंग यावर उठवले गेले.  हे प्रसंग जास्तच ताणलेत, किंवा हे जरा अती होतयं, असं काहीसं मत अनेकांनी व्यक्त केलं!  होय, ते थोडसं अती झालयं.  पण, त्याची परिणामकारकता मात्र प्रचंड होती.  चित्रपटात दाखवलेले प्रसंग काही अमानवी किंवा अकल्पित नव्हते,असे छोटेमोठे प्रसंग सगळीकडेच घडतात.  रँगिंगचा 3 Idiots मध्ये वापरलेला प्रकार तर बराच प्रसिध्द आहे.  फक्त या आतल्या गोष्टी पहिल्यांदाच चव्हाटयावर आल्या.त्यामुळे थोडा त्रास झाला इतकेच. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळंतपणाचा प्रसंग.  या प्रसंगानं काय दाखवून दिलं.  तर आपला बघण्याच दृष्टीकोन किती फरक पाडू शकतो ते!!  प्रख्यात मराठी लेखक ”शाम मनोहर” यांच्या ”उत्सुकतेने मी झोपलो” मध्ये एक पात्र म्हणते, की चित्रपटात मानवी जीवनातीले सर्व टप्पे घेतली जातात, पण  बाळंतपणाचा टप्पा काही घेत नाहीत.कडु असले तरी  हेच सत्य होते!  अश्लीलता, व्हल्गरपणा यायच्या भितीनं मानवी जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग, घटना चित्रीत करणं, सगळयांनीच आजपर्यंत टाळलं होत.   मात्र, प्रस्तुत चित्रपटात याचं चित्रण तर केलं गेलचं.  पण या सर्वांत अश्लीलतेचा स्पर्शही नव्हता आणि, तरीही ते किसळवाणेही वाटलं नाही.  एक अवघड प्रसंग, पाय घसरायच्या अनेक जागा असताना अतिशय सुयोग्य पध्दतीने मांडल्याबद्दल उलट मी दिग्दर्शकाचे अभिनंदनच करीन. कारण जे भारतीय समाजात दाखवणे जवळ जवळ अशक्य होते ते त्यांनी करुन दाखवले.तुम्हालाही असे वाटत नाही का?
                         

                        शेवटी कसं आहे, एखादी घटना आपण बघतो तशी आपल्याला दिसते. मी काही आमिर खानचा प्रसिद्धी प्रमुख नाही आहे की या चित्रपटाबद्दल इतके चांगले बोलत आहे . पण हा असा चित्रपट आहे की जो आत्तापर्यंतचा सर्वातप्रसिद्धचित्रपटआहे .त्याहुन महत्त्वाची गोष्ट म्हणजे  जेव्हा करोडो लोक असा चित्रपट बघतात तेव्हा प्रत्येकाचा पाहण्याचा नजरिया ,समजायचा नजरिया वेगळा असतो .कुणाला यातल्या संदेशामुळे नवी उमेद मिळते तर कोणी त्यातली आत्महत्याच तेवढी घेतो. आणि मग इथे प्रश्न निर्माण होतो ,काय घ्यायचे ,एखाद्या कलाकृती कडे कसे पाहावे ,निदान कसे पाहणे समाजाच्या दृष्टीने हिताचे ठरेल इ. आणि याला उत्तर शोधावेच लागतेआणि ती नजर स्विकारावी लागते.   पाण्याने भरलेला अर्धा  ग्लास आहे,    कुणाला तो ग्लास अर्धा भरलेला दिसतो.  तर कुणाला अर्धा रिकामा.  मी 3 Idiots पाहून ”बाबा रांछोडदास की जय” म्हणेन. तर कोणी हट! काय बोगस चित्रपट होता.  फरक नजरेचा असतो.   आपला दृष्टिकोन बराच फरक पाडू शकतो  हेच आपण विसरलो होतो.  त्याची जाणीव पुन्हा या चित्रपटाने करून दिली, इतकेच. बाकी, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा ऍंगल बदलणे हेसुध्दा त्या प्रश्नाचे उत्तर असु शकते नाही का? काय म्हणता…..?

विनायक पाचलग
marathilikhan@gmail.com

>मेळाव्यानंतर….

>कालचा रविवार मराठी साहित्य क्षेत्रातला एक ऐतिहासिक रविवार आहे हे आपण सारे जाणतोच. अभिव्यक्तीचे नवे माध्यम असलेल्या ब्लॉगर्सनी एकत्र येणे ही काही खायची गोष्ट नाही.. याच मेळाव्याला काही अपरिहार्य कारणामुळे ( परीक्षा हो राव ,बाकी काही नाही) मी येऊ शकलो नाही .पण दिपक दादा आणि पंकज याना फोन करुन सारखे पीडत होतोच. असो या निमित्ताने आणि काही वृत्तांत वाचुन मनात जे विचार आले ते मांडत आहे. चुक भुल समजुन घेणे

  1. ब्लॉग हे एक माध्यम आणि एक ताकद म्हणून पुढे येणे गरजेचे आहे, गेले कित्येक दिवस ते तसे  येत नव्हते . पण या बैठकीमुळे ते तसे आलेले आहे, याचा आनंद आहे.यासाठी पेठेकाका , दिपक दादा ,अनिकेत यांचे मनापसुन आभार.मात्र यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजकाल ब्लॉग हे नाव लोकाना माहित आहे पण मराठीत ब्लॉगिंग करणे कोणाला माहित नाही. आणि काही टुकार लेख लिहून ,ज्याना ब्लॉगिंग माहितही नाही असे लोक विविध माध्यमातुन ब्लॉग विषयी बोलत  आहेत. हे घ्या उदाहरण 
  2. http://72.78.249.125/Sakal/21Jan2010/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm
  3. असे होऊ नये यासाठी प्रत्येक ब्लॉगरने यासंबंधी प्रयत्न करणे गरजेचे आहे.( मी तसा प्रयत्न केला असुन आत्तापर्यंत सकाळ मुक्तपीठ चा वापर करुन मराठी नेटविश्वाची माहिती देणारे तीन लेख लिहिलेले आहेत)
  4. आजही मराठी ब्लॉग विश्वाचा विकास होणे गरजेचे आहे. विकासामध्ये सर्वसाधारणपणे गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ अपेक्षित असते ,यासाठी ब्लॉग लिहिण्यासाठी इतराना तर प्रवृत्त केले पहिजेच, पण जे लेखक आहेत ,किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांनी ब्लॉग विश्वात प्रवेश करायला हवा. यासंबंधी तीन लोकांना मी तयार केले असुन लवकरच त्यांचे ब्लॉग सुरु होतील . पण या दृष्टीने सातत्यपूर्ण  प्रयत्न गरजेचे आहेत. हे सगळे सांगायचे कारण असे की कितिही झाले तर आज नियमित मराठी ब्लॉगर ची संख्या ५०० च्या वर जाणार नाही ,आणि ८ कोटी जनतेत ५०० म्हणजे किस झाड की पत्ती त्यामुळे आपल्या कामात अडथळे येऊ शकतात.
  5.  विविध लेख लिहिण्याच्या निमित्ताने बर्‍याच वृत्तत्रातील संपादकांशी आणि इतर लोकांशी बोलायची संधी मिळते तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते की बरेच लोक ब्लॉग ला समांतर माध्यम मानत असुन त्याला मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे अवघड जात आहे. यासाठी आपण आणि विशेषतः ब्लॉगर पत्रकारानी प्रयत्न करायला हवा. मध्यंतरी ब्लॉगवरील लेख सकाळ छापायचे पण तेही आता बंद झाले आहे…
  6. येथे एक मुद्दा मांडावा वाटतो ,स्पष्ट बोलायचे तर सध्य स्थितीत मराठी संकेतस्थळांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. क्वालिटी की क्वांटीटी या वादात त्यांनी त्यांची लय हरवली असुन सध्या कोणतेही संस्थळ लिहायच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणुनच बरेचसे ब्लॉगर अशा साइट पासुन कटाक्षाने दुर आहेत. तेव्हा मला असे वाटते की आपण ब्लॉगरने असे एखादे संस्थळ उभे करणे गरजेचे आहे. याची कारणे अशी आहेत
  7. १. आज आप  ब्लॉगर आपल्या ब्लॉगवर लिहितो ,आणि येणार्‍या कॉमेंट मधुन त्यावर चर्चा होते .
  8. २. या कॉमेंटला लिमिटेशन आहेत. उदा . एखाद्याने ब्लॉगवर लिहिले आहे हेच आपल्याला बर्‍याचदा वेळेवर कळत नाही ,कारण मराठी ब्लॉग्स्वर सतत अपलोडींग होत असल्याने ब्लॉग लगेच खाली जातो. शिवाय कमेंट देताना वर्ड वेरिफिकेशन वगैरे अनेक झंझटीमधुन जावे लागते.
  9. ३. यावर उपाय म्हणुन मिसळ पाव किंवा मनोगत सारखे संस्थळ निर्माण करावे ज्यावर रजिस्टर होण्यासाठी आपण ब्लॉगर असणे ही एक्मेव अट असावी .सर्व ब्लॉगरनी ब्लॉगवरच लिखाण करावे .पण ज्यावर व्यापक चर्चा ,उहापोह अपेक्षित आहे ते लेख त्यानी अशा साइट्वर टाकवेत त्यामुळे मराठीतच ( आज बर्‍याचशा ब्लॉगवर मराठी प्रतिक्रिया येत नाहीत ,कॉपी पेस्ट ला वेळ नसल्याने) आणि नीट चर्चा होईल .
  10. ४. कधीकधी एकाच ताज्या घडामोडीवर वेगवेगळे ब्लॉगर लिहितात ,ते पहायला प्रत्येक ब्लॉगवर जावे लागते, काँमेट वाचायला पुन्हा… हे टाळता येईल . तेव्हा स्वतःची आणि ब्लॉगची आयडेंटीटी जपत असे संस्थळ साकारता येइल .दिपक दादा आणि ||राजे|| हे ब्लॉगर यासाठी मदत करु शकतात.
  11. ब्लॉग च्या माध्यमातुन बर्‍याचश्या उपक्रमाना मदत करता येइल. उदा .मराठी अभिमान गीत इ.
  12. आजही ब्लॉगमध्ये विषय विविधता कमी आढळते यासाठी प्रयत्न हवे आहेत.
  13. बाकी मेळाव्यात मांडले गेलेले सर्व विचार उत्तम आहेतच. आणि या सर्व उपक्रमात मी सक्रिय सहभागी असणार आहेच हे वेगळे सांगणे न लगे .मात्र पुढील आखणी होताना या बाबींचा विचार गरजेचा आहे असे वाटते
  14. प्रेस कॉन्फरंस आणि संमेलनाध्यक्षाना भेट हे मुद्दे उत्तम आहेत. त्या आगोदर ग्रुप च्या माध्यमातुन प्रत्येक ब्लॉगचा लेखक आणि त्याचा ई-पत्ता प्रत्येकाला  मिळावा अशी विनंत्ती आहे.त्यामुळे कोणाचे कशात स्पेशलायजेशन आहे तेही कळेल, उदा नीधप- वेशभुषा ,भुंगा- नेट इ. आणि त्याचा इतराना फायदा होईल, माहिती मिळेल.
  15. बाकी प्रकाशकांचे सहकार्य आहे ते उत्तमच पण नेटभेट आणि ई =बुक चळव ळ वाढवायला हवी
  16. असो, हे मुद्दे आता सुचले असेच काही मुद्दे मांडणारा प्रसन्न जोशींचा साधनातला लेख अपुरा असला तरी वाचनीय आहे तो तुम्ही इथे वाचु शकटा .
  17. http://weeklysadhana.com/index.php/2009-12-21-10-09-25/cat_view/38— ९ जानेवारीचा अंक

      या सर्व उपक्रमात माझे पुर्ण सहकार्य, पुढाकार आणि सहभाग राहिल …
      असो
      आता थांबतो
      जाता जाता- अजुन मुद्दे तुम्ही सांगालच ,काय?
      घोषणा – रंगकर्मी .कॉम पुन्हा येत आहे ,थोड्याच दिवसात….
      आपला,
      विनायक
      वेळ नव्हता ,पण लिहायचे होते म्हणून लिहिले आहे. टायपिंग चुकाना समजुन घ्या व माफ करा.

      >चेतन भगतला एक अनावृत्त पत्र

      >


       वाचण्यापुर्वी

      आनंदाची गोष्ट- हे अनावृत्त पत्र वाचण्यापुर्वी एक आनंदाची गोष्ट, सदरचा लेख (पत्र) हे महाराष्ट्रातील एक दर्जेदार साप्ताहिक “साप्ताहिक साधना” च्या या आठवड्याच्या ( जानेवारी २०१०) च्या अंकात प्रकाशित झालेले आहे. तो अंक मी लवकरात लवकर नेटवर उपलब्ध करुन द्यायचा प्रयत्न करत आहे. माझ्या पत्राला योग्य व्यासपीठ दिल्याबद्दल साधनाचे युवा संपादक विनोद शिरसाठ यांचे जाहिर आभार.
      सुचना- मागे म्हटल्याप्रमाणे सध्या लेखणीला विश्रांती आहे, त्यामुळे हा लेखही पुर्वलिखित आहे, साहजिकच यात थ्री इडियटस चे संदर्भ नाहीत, फक्त हा लेख प्रकाशित होण्याची वाट पाहत होतो त्यामुळे तो आज प्रकाशित करत आहे.
      विनंती- या अंकाचा अधिकृत प्रकाशन सोहळा १२ जानेवरी २००९ रोजी प्रख्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर व विवेक सांवत यांच्या हस्ते साधना मिडीया सेंटर ,शनिवार पेठ ,पुणे येथे होत आहे. या कार्यक्रमास आपण जाऊ शकल्यास आनंद आहे. मात्र जाणार असल्यास ब्लॉगवर कळवण्यास विसरु नका.
      विनायक





      प्रति,
      चेतन,
                    हाय चेतन !  खरतर, तुला पत्र लिहिणार नव्हतोच, तुझं पुस्तक आवडलं अस सांगणार एखादं द्विट टाकणार होतो. तेवढ बास झालं असतं .पण मला जे बोलायचे आहे ते 140 अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.  खरंतर बरोबर २ वर्षापूर्वी एका लेखातून तुझी मला ओळख झाली.  आणि, तेंव्हापासून आजपर्यंत मी तुझा फॅन होतो, आहे.कदाचित राहीनही आणि मग अर्थातच तुझी सगळी पुस्तकेही मी वाचलेली आहेत.आणि आता त्या अनुशंगानेच आज तुझ्याशी बोलणार आहे.


                 
                सांगायची गोष्ट अशी की, नुकतेच तुझे चौथे पुस्तक 2 States’ वाचले.  लग्नाची गोष्ट तु छान सांगितली आहेस. त्यात, स्वत:चीच कहाणी असल्याने नीट एक्स्प्रेस झाली आहे. लोकांना ही कहाणी आवडणार हे नक्की, त्याबद्दल तुझ आधीच अभिनंदन !  पण, खरं सांगु, एक ”पुस्तक” म्हणून मला ते अजिबातच आवडले नाही.  तुझे हे पुस्तक म्हणजे एका चित्रपटाची पटकथा आहे फक्त! आणि ते बाड तु डीरेक्टरला द्यायच्या आधी आमच्या तोंडावर मारलेले आहेस ,इतकेच.  अर्थात, त्यावर चित्रपट निघेलच !पण मित्रा , पुस्तकावर चित्रपट निघणे वेगळे आणि, चित्रपटची स्टोरी पुस्तक म्हणून विकणे वेगळे .  अगदी प्रसंग, पात्र रचनाही तशीच आहे रे, चित्रपटासारखी….  तुला हे माहित असेलच की  अशा Love story कोपर्‍या कोपर्‍यावर घडतात. पडद्यावर त्या time pass म्हणुन 3 तास बघणे वेगळे, पण, वेळ काढून पुस्तकात पण तेच वाचण्यात काय अर्थ आहे?  चार चित्रपट एकत्र केले की झाले तुझे पुस्तक. मी अशी  स्टोरी लिहिण्याबद्दल म्हणत नाही आहे.,ती लिहावीच. पण ती ज्याप्रकारे लिहिलेली आहे, त्यात ज्या प्रकारचा मसाला जाणुन बुजुन भरला आहे ते मला खटकतय. 
                 
                 खरतर, तु आम्हा तरुणाईला आवडलेलास ,आवडतोस ते तुझ्या गोष्ट सांगायच्या कौशल्याने.  साध्या आणि Fuck, suck वाल्या तरूणाईच्या भाषेने,  विषयातल्या वेगळेपणामुळे. गेल्या 3 पुस्तकात तु एकच  गोष्ट सांगितलीस, 3 मित्र, एखादा बाबा, बुवा वा घडणारा प्रसंग.अगदी फाईव्ह पाइंट समवन मधला Rhyn असो, कॉल सेंटरच्या स्टोरीमधले लोक असोत,किंवा मग गोविंदची कहाणी.तेच घडले ना तिन्ही कथेत? हे सगळे जगावेगळे करायला गेले ,पण त्याना जमेना. मग कधी देव आला तर कधी आपलाच आतला आवाज. मग ते सुधारले आणि मग नेहमीप्रमाणे  Happys Endings .एखादी लव स्टोरी.एखादा  Adult  परिच्छेद ,असो. पण आम्ही ती पुस्तके वाचली,डोक्यावर घेतली ,आजही ही तिन्ही पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीतुन खाली आलेली नाहीत हे काय सांगते. असे झाले कारण तु ज्याप्रमाणे कथेच्या पार्श्वभुम्या बदलल्यास,थोडेफार नवे विश्व उलघडवलेस, आम्हाला गुंतवलस ते आम्हाला आवडल.  पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची  पातळी घसरत गेली.आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे आणि तुझ्या कहाण्यात जो बदल व्हायला हवा तो दिसत नाही आहे.  चौथ्या पुस्तकात  तर तु फक्त चार चित्रपटाच्या पटकथा एकत्र केल्या आहेस.खरतर एक Message द्यायचा तु थोडाफार प्रयत्न केला आहेस खरा.पण तो मेसेज अजुन तुलाच समजलेला नाही हे लगेच कळते ,मग कशाला हा अट्टहास.  चेतन, हे असे का ? 
                
                   यावर तुझां MBA style उत्तर मला मिळेल, “मी लोकांना जे आवडेल ते देतो.”  वाचकांची पातळी घसरली, म्हणून मग मीही घसरलो.  बरोबर आहे, रसिकतेचे अवमुल्यन तर सगळीकडेच झाले आहे.  पण चेतन, त्याला बदलायची ताकद तुझ्यात आहे रे .आज ”चेतन भगत” हा एक ब्रँड झाला आहे.  मी हे पत्र अरविंद अडिगाला का लिहिले नाही?  नाही लिहिणार, कारण अभिरूची बदलायची ताकद तुझ्यात आहे.  त्याच्यात नाही.  आज ”चेतनचे पुस्तक” लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.एवढा लोकांचा विश्वास तुझ्यावर आहे.मग तु लोकांना बदलवु शकत नाहीस का?  तु म्हणतोस, मला नव्या भारताचा घटक बनायचे  आहे,तो घडवायचा आहे. मग आपली कथा सांगायची  ताकद तु त्यासाठी का वापरत नाहीस?  अशाच एखाद्या कहाणीतुन तु तुला समजलेला ,भावलेला आणि तरुण जनतेला उपयुक्त  विचार, भावना लोकांच्या गळी उतरवु शकत नाहीस का?  तसा प्रयत्न तु केलास थोडासा .पण  त्यात Message  तर गेला नाहीच, पण कथाच कोसळली. तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का रे?मग तुझी ती स्टोरी  आठवायला पुन्हा चित्रपटाला जायचे.(थ्री इडियटस, हॅलो) आम्ही तुझ्याकडून जरा चांगल्या ,मनाच्या कोपर्‍यात कायम्न टिकुन राहील अशा लिखाणाची अपेक्षाच ठेवायची नाही का? एकदा सांग बाबा या प्रश्नाचे उत्तर……
                
                तु चित्रपट लिही रे, जरूर लिही.  200 रूपयाचे तिकिट काढून आम्ही ते पाहू ही.  पण मनोरंजनाला जीवनात दुय्यम स्थान आहे.  ते साधन आहे साध्य नव्हे. तुझ्या स्वतःच्या शैलीत तु या आयुष्यातल्या ध्येयासंबंधी,ते पुर्ण करतानाच्या थराराविषयी ,जीवनातल्या निखळ आनंदाविषयी  कधी लिहिणार?असं कृत्रीम कॉल सेंटर्चे जग किंवा अकल्पित घटनानी भरलेली लव्ह स्टोरी असेच काहीसे तुझे पुढचे लेखन असणार का?आम्हाला तुझ्याकडुन नव ,चांगले वाचायचय.आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. भारतीय राज्यकर्त्यानी देशाच्या उज्ज्वल  भविश्यासाठी ज्या संस्था काढल्या. त्या दोन्ही संस्थांचा तु प्रतिनिधी आहेस.तुला स्वतःला व्यक्त करायची ताकद आहे. ती इथे वापर ना,पोटापाण्यासाठी चित्रपट लिहिणे वेगळे पण आपली लेखणी त्यासाठी खर्ची घालवणे वेगळे.  या चित्रपटातून बाहेर ये, काहीतरी Quality, Clasic दे.आम्हाला नवी उमेद दे. सांग आम्हाला काहितरी आणि, हे फक्त तुचं सांगु शकतोस. अगदी साधी साधी गोष्ट तु आमच्या मनात बिंबवु शकतोस. कारण,
      Young India loves to hear you.

                    मी तुझा ट्विटरवरचा Follower  आहे, तुला माहिती नसेलही  पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो.  पण एमएनएस वर केलेले.  sucks, fucks  सारखे tueets वाचून हळहळतो रे.  आमचा हिरो वैचारिकरित्या इतक्या अस्थिर, अनस्टेबेल आहे का? तुझ्या चार पुस्तकात एक बर्‍यापैकी सारखे पण होते ते म्हणजे तुझे सगळे नायक सीस्टीमच्या विरोधात जातात. बरोबर आहे ,हा विचार तु देऊ इच्चितोस .पण प्रत्येक जण त्यात हरतो आणि कोणती तरी तिसरी व्यक्ती त्याला मदत करते. आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet  आणि TOI  मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना?


                     मी खुप बोलतोय मला माहित आहे, बरेचसे चुकिचेही असेल. कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे. खरतर हे सगळे माझ्या अपेक्षाभंगातून आलेले आहे. , पत्र लिहिण्याइतकी आत्मियताही कुठुन आली ते  माहित नाही.कदाचित मी पण IIT त जायचे स्वप्न पाहतोय म्हणून आली असेल.  मी पण गोंधळलेलो आहे. तुझ्याकडुन अशी अपेक्षा ठेवावी की नको, माझ्या हिरोला मी असे खडे बोल सुनवावेत का?  नाहीतर, अशा  Movie style पुस्तकात  messeage शोधत बसावा  का? नाहीतर असा मेसेज वगैरे काही नसते, असा दिशा देणारा कोण नसतो, लिखाण फक्त मनोरंजनासाठी असते ,निदान तूझे तरी तसे आहे असे समजायचे का? सांग रे, यंग इंडिया जाउ देत, निदान I Want to hear from my Idol,  असो,जास्त बोलत नाही फक्त एवढेच की
       I am  waiting ………
            
                                                                                                      तुझा फॅन,
      विनायक पाचलग

      >तुम चलो तो… !!!

      >

      उप्स ! २००९ ही संपल एकदाचं! एक सांगु,वर्ष संपत आल्याची खरी जाणीव होते ती वृत्तपत्रे वाचतानाच, बरोबर ना?  गेले आठवडाभर विविध सदरांचे समाप्तीचे लेख वाचतो आहेच,आणि त्यामुळे आजुन एक साल जगाच्या कॅलेंडरमधुन वजा झाले हे पुन्हा पुन्हा जाणवत आहे.आणि त्यासोबतच वेगवेगळे विचारही मनात येत आहेत.  यासगळ्यातच मला माझाच एक लेख आठवला.  २००८ संपताना एका संस्थळावर मी “काय कमावले, काय गमावले?”  अशा अर्थाचा एक लेख लिहिला होता, आणि त्यावेळी आलेले  बहुतांशी प्रतिसाद हे अर्थातच नकारात्मक होते आणि, आज  ३६५ दिवस उलटुनही ते प्रतिसाद तसेच नकारात्मकच वाटत आहेत.परिस्थीती बदललेली नाही याचेच हे द्योतक आहे असे म्हणायला हरकत नाही.  हा! आजकाल सर्व माध्यमांना या परिस्थीतीची जाणीव मात्र झालेली आहे.  आणि नेहमीप्रमाणे वर्षातले टॉप वगैरे वगैरे सांगताना सगळ्यांनी हा नकारात्मक शेवट अधोरेखीत केलेला आहे हे मात्र नक्की.  पण, ही परिस्थीती बदल्याणासाठीचे उपाय, मार्ग यावर फारच कमी चर्चा झालेली आहे ,होत आहे हे खेदकारक आहे.

      आता, 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकातील शेवटचे वर्ष सुरू होत आहे आणि गेली दोन वर्षे तर सर्वच अंगांनी अतिशय वाईट गेलेली आहेत.  महत्त्वाचे म्हणजे आपण पाहिलेले 2020 चे स्वप्न तर दर पावलागणिक जवळ येत आहे.  तेंव्हा,परिस्थिती बदल्याणासाठी तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.या सर्वांवर एकच  तातडीचा उपाय मला स्वत:ला दिसतो.  तो म्हणजे आपले ”बेसिक्स” तपासून पाहणे, आपली वाट कोठे चुकत आहे ते पाहणे. सध्या एक व्हिडीओ प्रचंड गाजतोय.  त्यात एक वाक्य आहे ”तुम चले तो हिंदुस्ता चले”. कदाचित हीच आपली वाट ठरू शकतो. प्रत्येकाने स्वतःला बदलणे हा परिस्थिती बदलवण्याचा एक सोपा आणि महत्त्वाचा मार्ग असेल यात शंकाच नाही. त्यामुळेच  आता आपल्या आजुबाजुच्या परिस्थितीच्या बदलाची जबाबदारी आपल्याच  म्हणजे तरुणांच्या अंगावर घ्यावी लागणार आहे.कारण काही दिवसात ७० % समाज हा तरुणांचा असणार आहे. आणि हे सगळे  सामाजिक जाणीव म्हणून नव्हे हा!  आपल्याच भल्यासाठी, कारण, आजुबाजुच्या परिस्थितीवरच आपले भविष्य अवलंबुन आहे ना!  आता महागाईने आपणच पिडीत आहोत ना!  आणि प्रगती झालीच तर ती आपणच उपभोगणार आहोत ना. (आणि म्हणूनच हा लेखही उपदेशांचा होत नाही, तर हे  एक परखड आत्मनिरिक्षण आहे) थोडक्यात, आता दोरी आपल्या  Young Jeneration  च्या हातात आलेली आहे. अशा निष्कर्षावर आपण येऊ शकतो.

      अरे ,हे असे का?  या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे, आजच्या यंग जनरेशन कडे पैसा आहे, शिक्षणाने आलेली बुध्दी आहे, नवनवीन माध्यमे आहेत आणि नवीन बदलांना आत्मसात करायची ताकद आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने परिस्थीती बदलायची ताकद  आजच्या तरुणाईत आहे. पैसा 31 डिसेंबरच्या दारूवरही उधळता येतो आणि एखाद्या उपक्रमालाही देता येतो, मोबाईल वरुन फुकट हजारो एसएमएस करता येतात आणि आपले विचारच बदलणारा एखादा एसएमएस ही करता येतो.  इंटरनेट, फेसबुक, वावरून टाईमपास करता येतो.  मुलां,मुलींशी फ्लर्ट करण्यात वेळ घालविता येतो.  किंवा मग इमेल्स चा वापर करून एखाद्या व्हिडीओने मिरजच्या वेळी झाले तसे डोके भरकटवता येते किंवा दुसर्‍या बाजुला मग इंटरनेट वापरून आपल्या जुन्या मित्राशी कनेक्ट होता येते,  चिरंतन आनंद मिळवता येतो किंवा एखादा उपक्रमही चालवता येतो.ही माध्यमे कशीही वाकवता येतात जी आजच्या जगाची खरी ताकद आहे.  आणि, या सगळया माध्यमांची वैशिष्टये अशी की या सगळया माध्यमात आपणच राजे आहोत, नो कन्ट्रोल ऑफ आदर.आणि या माध्यमांमुळेच आपण ताकदवान झालेलो आहोत.  पण, त्यामुळे हे सगळे कसे वापरायचे याचा निर्णयही  आपल्यालाच घ्यावा लागणार आहे.  स्पष्टच सांगायचे तर, आहे म्हणून वापरू अशी युथची मस्ती आता परवडणारी नाही.  आहा!  हा उपदेश नाही, महागाईमुळे शेवटच्या पाच दिवसात जेंव्हा लॅप मारायलाही पेट्रोल मिळत नाही.  किंवा मग एखाद्या वादात महत्वाची परिक्षा, इंटरव्हयू बुडतो, तेंव्हा गप-गुमान आपल्याला या सगळयाचा विचार करावा लागतो, लागेल.

      याचसोबत वर म्हटल्याप्रमाणे आपण ज्या बेसिक्स वर जगतो ते बरोबर आहेत ना हे मुळापासुन तपासून पाहावे लागेल, आपले  जगण्यातले ,वागण्यातले  PReferences बरोबर आहेत ना ते जाणुन घ्यावे लागेल, एखाद्या गोष्टीला किती महत्व द्यायचे ते आता ठरवावेच लागेल.  हो! हो! हे प्रश्न पुर्वीही होते,मान्य आहे की  हे काही एका रात्रीतुन उगवलेले नाहीत, किंवा मी काही  माझ्या लिखाणातुन भयचक्र उभे करत नाही आहे. फक्त मंदी, नैसर्गीक आरिष्टे ,महागाई आणि ढासळलेली नैतिकता या सार्‍यांमुळे हया प्रश्नांची आता फक्त इंटेसिटी वाढली आहे, आणि, त्यामुळेच त्याझी झळ आता सर्व सामान्य माणसाला बसु लागलेली आहे.   आणि, जेंव्हा पाणी गळयापर्यंत येते, तेंव्हा आपल्यालाच उपाय शोधावा लागतो.बरोबर का चु़क,  तुम्हाला काय वाटते?

      आणि हा फ्रेंडस ,आणखी महत्वाची गोष्ट.   आता आपल्याला आपली अभिरूची जपायची की नाही  याचाही  निर्णय घ्यावा लागेल.  अर्थात, गेल्या काळात मराठी चित्रपटांना, कार्यक्रमांना आपण दिलेला प्रतिसाद मराठी संस्कृती आजही आपण जपत आहोत याची साक्ष देणारा आहे.  मात्र रिऍलिटी शो चे जे वेड आपल्यात आहे ते, आता पूर्णत्वाने फेकून द्यायला हवे.  आपल्याला या मिळालेल्या आयुष्यात कसे जगायचे, हे ठरविण्यात वेळ घालवायचा की, आपण मागच्या जन्मात कोण होतो, 2012 ला काय होईल हे ठरविण्यात वेळ घालवायचा?  आणि दोस्तहो, आपल्याच भाषेत बोलायचे तर ”आली जगबुडी, तर सगळेच मरणार आहेत की  मग आपण का डोके पिकवून घ्या, काय?” अभिरुची जपणे हा सध्याची परिस्थिती बदलण्याचा महत्त्वाच भाग असनार आहे , कारण आपली अभिरुची जपल्यानेच अशा कसोटीच्या क्षणी आपले मानसिक संतुलन आपण टिकवु शकणार आहोत.आणि सर्वात महत्वाचे, राजकारण्यासाठी आपण आपले डोके किती पेटवून घ्यायचे, हे ही ठरवावयला हवे आता, तुम्हाला कॉलेजात ऍडमिशन घ्यायला काही ते येणार नाही आहेत!  थोडक्यात काय, तर आपल्या मुठीतील ,मनातली ताकद आता वापरावी लागणार आहे तीही विचार करुन! त्यामुळेच मनगटातली ताकद आणि माध्यामानी दिलेली ताकद याचा अचुक संगम आता साधावा लागणार आहे.

       हे झाले तरूणाईबाबत. पण अर्थातच, आजुबाजुची परिस्थितीही बदललीच पाहिजे.आणि परिस्थितित पुन्हा येतो तो मीडियाच- Most affecting thing in India.  आजकाल 24 तास चालणार्‍या वाहिन्या आहेत, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, रेडिओ आहेत.  यावर सतत काही ना काही चालू आहे.  चालू दे!  ताज्या घडामोडीवर लिखाण व्हावे, चर्चा, विचार मंथनात पानेच्या पाने खर्ची घालावीत, जरुर घालावीत.  माझी काही ना  नाही!  पण यातुन कुठेतरी शाश्वत मुल्यांकडे जाणार्‍या लिखाणालाही वाव मिळावा.  ज्येष्ठांच्या लिखाणातून तरूणंना आधार मिळावा,  नव्या जनरेशनला शिव्या घालण्याऐवजी आपल्या जे सांगावेसे वाटते ते सांगून मोकळे व्हावे.  निदान त्याचा जरातरी फायदा होईल.  आजच्या घडीला अख्खा देशात सर्वात जास्त अफेक्ट करतो ते मिडिया.  त्यामुळे आपणाबरोबर त्यांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.  बाकी, राजकारणी वगैरे आहेतच, पण त्यांची निवड आपणच केली ना !  (म्हणजे मत देऊन आणि न देऊन) त्यामुळे, त्यांच्या नावाने बोटे मोडण्यात काहीही अर्थ नाही.  खरतर यावर्षी लोकशाहीचा सर्वात मोठा जागर झाला.  पण, तो या पदध्तीने झाला त्यामुळे आपल्या आपल्यालाच त्रास होतो आहे, पण त्यातुनच बोध घेतला पाहिजे ना?

      असो, खुप बोललो, हा पण एक मात्र मनापासुन सांगतो, हा उपदेशाचा डोस नाही किंवा भरमसाठ अपेक्षा नाहीत.  आणि, परिस्थितीचा उगाचच केलेला बाऊ नाही.किंवा हा फुकाचा आदर्शवादही नाही.  गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना आणि त्यावर उमटलेले पडसाद यातुन दिसणारे हे चित्र आहे,  आणि ते बदलणे आता दुसऱ्या कोणाच्या हाती नाही,  तर आपल्या हाती आहे.याची झालेली जाणीव आहे. पडणारा सेन्सेक्स, भाषिक दंगली, मद्याचा महापूर, पेड न्यूज,अनेक प्रकरणातुन उघडे पडलेले राजकारणी आणि स्वाईन आणि महागाईच्या तडाख्यात मेटाकुटीला आलेले सामान्य हे सगळं हेच सुचवतात ना? ही सगळी  प्रगतीची लक्षणे आहेत का? यात बदल हवाच ना?  बाकी काय निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. हे सगळे जमेल अशातला भाग नाही ,तशी आशाही नाही. पण काहीतरी फरक पडला पाहिजे असे मात्र मनापासुन वाटते.त्यासाठीच स्वानुभव आणि परिस्थिती याची सांगड घालुन हा लेखप्रपंच केला आहे. बाकी,३१ डिसेंबरला रात्र जगवल्याने नवीन वर्षात डोळे तसे उशिराच उघडतात, उघडू देत…. पण  परिस्थीतीची जाणिव होऊन ते डोळे कायमचे उघडतात की नुसतेच एक नवा दिवस जगायला उघडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.  मी बापडा परिस्थितीच्या जाणिवेने आपल्या सर्वांचे डोळे खाडकन उघडतील,  आणि  भौतीक ,मानसिक प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करू अशी आशा बाळगतो आणि थांबतो, काय?       हा ,  बाय द वे हॅपी न्यू ईयर !!!

      हाच तो व्हिडिओ….
      अर्धविराम
      मित्रानो, २००९ संपतय,२०१० उजाडतोय. वर्षभरातला हा माझा ५५ वा लेख. या वर्षाने मला खुप काही दिले. अनेक मित्र , प्रगल्भता आणि बरेच…. पण आता मात्र थोडा अर्धविराम घेतोय. येते वर्ष माझ्यासाठी खुप महत्त्वाचे आहे .या वर्षात बारावीसह काही महत्त्वाच्या परीक्षाना मी सामोरा जात आहे. तेव्हा १० मे पर्यंत लेखणी म्यान करण्याचा निर्णय घेऊन मी ब्लॉगला अर्धविराम देत आहे. मात्र माझे काही जुने अप्रकाशित लेख प्रकाशित करुन मी ब्लॉगला लाईव्ह ठेवण्याचा प्रयत्न नक्की करणार असुन रंगकर्मी .कॉम हा उपक्रमही येत्या १० दिवसात नव्या जोषात पुन्हा चालु होत आहे. तेव्हा मिलेंगे छोटेसे ब्रेक के बाद..

      तुमचाच 

      विनायक